Latest Mahindra Thar ROXX 2026 Review in Marathi : Best फीचर्स मायलेज ,किंमत ,परफॉर्मन्स ..

Latest Mahindra Thar ROXX 2026 हे नाव ऐकल की डोळ्यांसमोर येते ती रगड ताकत ,खडतर रस्ते आणि बेधडक ऑफ रोडिंग . पण आता Mahindra ने या आयकॅानिक SUV ला नव्या रूपात आणले आहे ,Mahindra Thar ROXX . हा फक्त 5- door थार नाही ,तर एक प्रीमिअम ,स्मार्ट आणि फॅमिली -फ्रेंडली ऑफ रोड SUV आहे . ज्यांना स्टाइल ,comfert आणि परफॉर्मन्स एकाच गाडीत हवा आहे , त्यांच्यासाठी Thar ROXX हा गेम – चेंजर ठरतो .

Latest Mahindra Thar ROXX 2026

या ब्लॉग मध्ये आपण Thar ROXX चे डिझाईन ,इंटेरिअर ,इंजिन, मायलेज आणि सेफ्टी ऑफ रोड क्षमता आणि एकूणच व्हॅल्यू फॉर मनी याचा सविस्तर आढावा घेणार आहोत .

Thar ROXX Primium Design

Latest Mahindra Thar ROXX 2026 च बाह्यरूप पाहिल्यावरच कळत की ही सामान्य SUV नाही . पारंपारिक बॉक्सी लुक जपून ठेवत Mahindra ने तिला अधिक मॉडर्न टच दिला आहे .

समोर मोठी ग्रिल ,LED प्रोजेक्टर हेडलाइट ,स्टायलिश DRLs आणि मजबूत बंपर यामुळे रोडवर ही गाडी लगेच लक्ष वेधून घेते . 5 door डिझाइनमुळे मागील प्रवाशांसाठी सहज प्रवेश मिळतो ,ज्यामुळे ही SUV आता केवळ साहसी लोकांसाठी नव्हे तर कुटुंबासाठी परफेक्ट झाली आहे . मोठे अलॉय व्हील्स ,उंच ग्राऊंड क्लिअरन्स आणि रुंद टायर मुळे Thar ROXX ला जबरदस्त रोड प्रेझेन्स मिळतो . शहर असो किंवा खडतर रस्ता – ही गाडी सर्वत्र उठून दिसते . विशेसत: या कारच्या कलर निवडी मुळे या कारला वेगळा लुक येतोय ,यामध्ये लाल , काळा ,पांढरा हे रंग आहेत .

Tata Punch Pure 2026 मार्केट मधी आली परवडणारी तगडी कार ..

Thar ROXX Interiar ( Latest Mahindra Thar ROXX 2026 )

  • मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
  • वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay
  • वायरलेस चार्जिंग
  • प्रीमिअम Harman Kardon साऊंड सिस्टम
  • व्हेंटीलेटेड फ्रंट सीट्स
  • ड्युअल – झोन क्लायमेट कंट्रोल
  • Panoramic सनरूफ
Latest Mahindra Thar ROXX 2026

Thar ROXX Engine आणि परफॉर्मन्स

Latest Mahindra Thar ROXX 2026 मध्ये आपण इंजिन व परफॉर्मन्स पाहणार आहोत .

यामध्ये दोन इंजिन ऑप्शन उपलब्ध आहेत :

  • पेट्रोल इंजिन :
  • 2.0 लीटर टर्बो पेट्रोल
  • जबरदस्त पॉवर आणि टॉर्क
  • 6- स्पीड Manual / ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
  • डिझेल इंजिन :
  • 2.2 लिटर mHawk डिझेल
  • उत्कृष्ट लो – अँड टॉर्क
  • हायवे ड्रायव्हिंग साठी परफेक्ट

Thar ROXX Mileage ( Latest Mahindra Thar ROXX 2026)

  • पेट्रोल व्हेरीअंट : अंदाजे 11-12 kmpl
  • डिझेल व्हेरीअंट : अंदाजे 14-15 kmpl

ऑफ रोड SUV साठी हे आकडे योग्य मानले जातात . योग्य ड्रायविंग केल्यास तुम्हाला चांगला मायलेज मिळू शकतो .

टॉप लेव्हल सेफ्टी फीचर्स :

  • 6 एअरबॉक्स
  • इलेक्ट्रोनिक Stability कंट्रोल ( ESC )
  • Traction Cantrol
  • हिल होल्ड असिस्ट 360 – डिग्री कॅमेरा
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम ( TPMS )

याशिवाय काही व्हेरीअंट मध्ये ADAS ( advanced Driver Assistance System ) देखील दिल आहे . जे लांब पल्याच्या प्रवासात अतिरिक्त सुरक्षितता देते .

ऑफ रोड – Thar ROXX च खर बळ :

  • 4 x 4 ड्राइव सिस्टम
  • मल्टिपल टेरेन मोड्स ( Sand , Mud , Snow )
  • स्मार्ट Crawl असिस्ट
  • वॉटर व्यॅडिंग क्षमता
  • उत्कृष्ट अप्रोच आणि डिपारचर अँगल

म्हणजेच तुम्ही डोंगर , जंगल , वाळवंट किंवा चिखल – कुठेही नि:संकोचपणे Thar ROXX घेऊन जाऊ शकतात .

Thar ROXX Price And व्हेरीअंट

व्हेरीअंट किंमत
MX1 रु 12.99 – रु 13.99 लाख
MX3 रु 14.99 – रु 17.49 लाख
MX5 रु 16.49 – रु 18.49 लाख
AX3L रु 16.99 लाख ( डिझेल MT )
AX5L रु 18.99 लाख ( डिझेल AT )
AX7L रु 18.99 – रु 20.99 लाख
Star Edition From रु 16.85 लाख

Latest Mahindra Thar ROXX 2026 कोणासाठी योग्य ?

  • तुम्हाला ऑफ -रोडिंग ची आवड असेल
  • तुम्हाला स्टायलिश आणि दमदार SUV हवी असेल
  • तुम्हाला फॅमिली वापरासाठी 5- door कार हवी असेल
  • तुम्हाला टेक्नॉलजी आणि सेफ्टी दोन्ही हवेत

निष्कर्ष :

Latest Mahindra Thar ROXX 2026 ही केवळ एक गाडी नाही – ती एक अनुभव आहे , ताकत ,स्टाइल , comfert आणि आधुनिक टेक्नॉलजी यांचा अप्रतिम संगम म्हणजे Thar ROXX . सध्या बाजारात या कार ने खूप धुमाकूळ घातला आहे . तरुण वर्ग या कारकडे खूप आकर्षित होत आहे त्यामुळे कारला खूप प्रचंड मागणी वाढली आहे .

जर तुम्हाला अशी SUV हवी असेल जी शहरातही छान चालते आणि ऑफ रोडवरही खडतर आव्हाने पेलते ,तर Thar ROXX हा सर्वोत्तम पर्याय आहे . 5- door डिझाइनमुळे कुटुंबासाठी उत्तम आहे आणि प्रगत टेक -फीचर्स मुळे आधुनिक SUV चा अनुभव मिळतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top