BARC Technology : लवकरच ( Instant ) “बीएआरसी ” चे तंत्रज्ञान शेतकर्‍यापर्यंत पोहचविणार

Akola News : सध्याच्या काळात शेतकर्‍यांना जैविक उत्पादने कल वाढत आहे .सध्या उत्ती संवर्धित रोपांनाही मागणी वाढत आहे .हे सर्व लक्षात घेऊन महाबीज ने शेतकर्‍यांना नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी मुंबई मधील डॉ भाभा आण्विक संशोधन केंद्रासोबत करार केला आहे .यामुळे लवकरच आता शेतकर्‍यांना पाच अत्याधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करता येईल .नुकताच झालेल्या BARC Technologyया कार्यक्रमात हे तंत्रज्ञान आदान -प्रदान करण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे .

या हस्तांतरनात विविध mutation या तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित जैविक बुरशिनाशक ;ट्रायकोडरमा वायरएन्स ;वेस्ट डिकोम्पोसर ,कडूनिंबावर आधारित जैव कीटक नाशक ,मातीतील सेंद्रिय कर्ब परीक्षण तंत्र्ज्ञान आणि उती संवर्धन केळी प्रोटोकॉल या पाच महत्वपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश आहे .

हस्तांतर करारावर तंत्र्ज्ञानप्रमुख डॉ दांनीयल बाबू आणि महाबीज व्यवस्थापक डॉ प्रफुल्ल लहाणे यावर यांनी स्वाक्षर्‍या केल्या .महाबीज च्या संचालिका श्रीमती बुवनेश्वरी एस बार्क चे डॉ हसन,नाभीकीय कृषि व जैव विभागाचे अध्यक्षा डॉ आनंद बल्लाळ हे उपस्थित होते .

यामध्ये महबिजचे व्यवस्थापक विवेक ठाकरे ,विपणन महाव्यवस्थापक विजयराज देशमुख ,बीज परीक्षण अधिकारी आर आर पाटील ,विभागीय व्यवस्थापक रवी कुलकर्णी व नागपुर येथील जिल्हा व्यवस्थापक पी पी जैन उपस्थित होते .

या तंत्रज्ञानाच्या हस्तंतरणामुळे राज्यातील शेतकर्‍यांना उच्च प्रतीची आधुनिक कृषि उत्पादने व उत्पादन क्षमता वाढ होण्यास मदत होते . Contact

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top