भारतातील Latest electric car 2026 इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वेगाने वाढत आहे . पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किंमती , पर्यावरणाची जागरूकता आणि सरकारी प्रोत्साहनामुळे अधिक आधी लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत आहे . 10 लाखांखालील बजेट मध्ये आता काही उत्कृष्ट EV पर्याय उपलब्ध झालेले आहेत . या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला या किंमत श्रेणीतील सर्वोत्तम इलेक्ट्रिक कारबद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत . Latest Updated By Now..

इलेक्ट्रिक कार का निवडावी ?
Latest electric car 2026 कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेलच्या जागी विद्युत मोटर आणि बॅटरी वापरली जाते . यामुळे प्रदूषण होत नाही . आवाज कमी असतो आणि देखभाल खर्च अत्यंत कमी होतो . रोजच्या प्रवासासाठी electricity खर्च पारंपरिक खर्चाच्या तुलनेत 70 -80% कमी येतो . त्यामुळे शहरातील दैनंदिन प्रवासासाठी EV एक उत्तम निवड आहे .
Latest electric car 2026, 10 लाखांखालील सर्वोत्तम कार – तक्ता
| मॉडेल | किंमत एक्स शोरूम | रेंज | चार्जिंग वेळ | बॅटरी क्षमता |
| MG Comet EV | 6.24-8.82 लाख | 230Km | 5-7 तास | 17.3 kWh |
| Tata Tiago EV | 7.99-11.14 लाख | 250-315Km | 6-7 तास ( एसी ) | 19.2/24 kWh |
| Tata Punch EV | 9.99-14.44 लाख | 315+Km | 7-8 तास | 25-25 kWh |
MG Comet EV – सर्वात स्वस्त आणि कॉम्पॅक्ट
- किंमत : रु 6.24 लाखांपासून ( एक्स – शोरूम )
- रेंज 230 किमी
- बॅटरी 17.3 Kwh
- पॉवर 42 PS / 110 Nm
Latest electric car 2026 मधील Mg Comet Ev भारतातील सर्वात स्वस्त एलेक्ट्रिक कार आहे . हे अत्यंत कॉम्पॅक्ट आणि शहरी वापरासाठी योग्य आहे . 2+2 बसण्याची व्यवस्था असलेली ही कार लहान कुटुंबासाठी किंवा दुसरी कार म्हणून आदर्श आहे .
वैशिष्ट / खासीयत :
अत्यंत या गाडीला कमी पार्किंग स्पेस लागतो . रोजच्या ऑफिस साठी योग्य आहे .सिंपल इंटेरेयर पण functional dezine . शहरातील ट्राफिक मध्ये सहज फिरता येते .
Tata Tiago EV – सर्वोत्तम व्हॅल्यू फॉर मनी
- किंमत : रु 7. 99 लाखांपासून ( एक्स – शोरूम )
- रेंज : 250 किमी ( MR ) / 315 किमी ( LR )
- बॅटरी : 19.2 Kwh / 24Kwh
- पॉवर : 61 PS ( MR ) / 75 PS ( LR )
Latest electric car 2026 Tata Tiago EV हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे . पाच जणांसाठी आरामदायी जागा , चांगली बिल्ड क्वालिटी आणि टाटा च्या मोठ्या सर्विस नेटवर्क मुळे हे पहिले EV खरेदीसाठी उत्कृष्ट आहे .
यामध्ये दोन बॅटरी पर्याय आहेत त्यामुळे 250 आणि 315 किमी रेंज आहे . ही कार 5 शिटर आहे . या कारला डिजिटल instument क्लस्टर आणि टचस्क्रीन आहे . 4 स्टार सेफ्टी रेटिंग आहे . 240 लीटर बूट स्पेस उपलब्ध आहे . या गाडीचा टॉप व्हेरीअंट 10 लाख ओलांडते . या गाडीला चार्जिंग ला 6-7 तास लागतात .
Tata Punch EV – SUV लुक आणि लांब रेंज
- किंमत : रु 9.99 लाखांपासून ( एक्स – शोरूम )
- रेंज : 315 किमी
- बॅटरी : 25-35 kWh ( व्हेरीअंट नुसार )
- पॉवर : 82-122 PS
Tata Punch EV हे सब -10 लाख रेंज चे एकमेव इलेक्ट्रिक SUV आहे . ( बेस व्हेरीअंट ) . मोठी जागा . SUV स्टाइलिंग आणि उत्कृष्ट रेंज यामुळे फॅमिली कारसाठी हा उत्तम पर्याय आहे . या गाडीला 190mm ग्राउंड क्लियरीनस , spesius केबिन आणि बूट , मल्टिपल ड्राइव मोड्स आणि 5- स्टार रेटिंग आहे .
Tata Punch pure 2026 : मार्केट मध्ये आली तगडी कार ..
चार्जिंग सुविधा आणि खर्च ( Latest electric car 2026 )
- घरी चार्जिंग :
- 5A सोकेट वर 10 -12 तास
- 15A सोकेट / वॉल चार्जर 6-7 तास
- विद्युत बिल : प्रती 100 किमी रु 100 -150
- पब्लिक चार्ज
- DC फास्ट चार्जर 30 -60 मिनिटात 80 % चार्ज
- Tata Power, Fortum , Ather Grid सारख्या नेटवर्क उपलब्ध
- शहरांमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रकचर वेगाने वाढत आहे .
रनिंग कॉस्ट तुलना
- पेट्रोल कार ( 15 Kmpl ) : प्रती 100 किमी रु 700 -800
- इलेक्ट्रिक कार : प्रती 100 किमी रु 100 – 150
- वार्षिक बचत : रु 40,000 -60,000 ( 15,00 किमी चालवल्यास )
खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा : Latest electric car 2026
1 : ऑन रोड किंमत : एक्स – शोरूम किंमत + रोड टॅक्स + इन्शुरन्स + ragistration = 10 -15% अधिक
2 चार्जिंग सुविधा : तुमच्या घरी आणि ऑफिस जवळ चार्जिंग उपलब्ध का ते तपासा .
3 दैनंदिन रेंज : तुमची दररोजची गरज किती किमी आहे ते ठरवा .
4 टेस्ट ड्राइव : नक्की खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राइव घ्या
5 वारंटी : बॅटरी वारंटी 8 वर्षे / 1.6 लाख किमी पर्यंत मिळते .
Latest electric car 2026 मध्ये 10 लाखांखालील इलेक्ट्रिक कार खरेदी करणे हे एक स्मार्ट आणि भविष्यातील गुंतवणूक आहे . Tata Tiago EV सर्वांगीण उत्कृष्ट पर्याय म्हणून उभी ठरते , तर MG Comet EV बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे . Tata Punch EV SUV प्रेमींसाठी आदर्श आहे . तुमची गरज ,बजेट आणि दैनंदिन प्रवास विचारात घेऊन निवड करा आणि इलेक्ट्रिक मोबिलिटि च्या भविष्याचा भाग बना .
Swift 2026 Latest :आकर्षक ,दमदार नवीन मायलेज सह कमी किमतीमध्ये ..
Top 5 best smartphone 2026 under 20,000 : जबरदस्त परफॉर्मन्स आणि फीचर्स