Tata Punch pure 2026 या टाटा पंच च्या कमी किमतीतील pure मॉडेल ची किंमत , मायलेज , सेफ्टी , फीचर्स आणि फायदे जाणून घ्या . रु 6 लाखात 5 – स्टार सुरक्षित SUV. सध्या कारच्या मार्केट मध्ये टाटा पंच नि धुमाकूळ घातला आहे . लोकांमध्येही याचीही खूप क्रेझ निर्माण झाली आहे . त्यातच टाटा च्या गाडीवर लोकांचा पहिल्यापासून विश्वास राहिलेला आहे .

Tata Punch pure 2026-बजेटमधील सुरक्षित SUV
भारतीय कार बाजारात Tata Punch ही SUV अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे . मजबूत बॉडी , 5 – स्टार सेफ्टी आणि किफायतशीर किंमत यामुळे ही कार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी उत्तम पर्याय ठरली आहे . विशेष म्हणजे Tata Punch चे सर्वात कमी किंमतीतील मॉडेल Tata Punch pure 2026 हे कमी बजेटमध्ये SUV घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आदर्श आहे .
Tata Punch pure 2026 ( Base Model ) किंमत Latest Updated
Tata Punch pure 2026 च्या base व्हेरियनटची किंमत एक्स शोरूम किंमत सुमारे 6 लाखापासून सुरू होते .
राज्यानुसार RTO , इन्शुरन्स मुळे ऑन रोड किंमत बदलू शकते , पण तरीही SUV सेगमेन्ट मध्ये ही किंमत खूप परवडणारी आहे .
इंजिन आणि परफॉर्मन्स
Tata Punch pure 2026 मध्ये खालील इंजिने दिली आहेत ;
- 1.2 लिटर पेट्रोल इंजिन
- 3 सिलेंडर Revotron टेक्नॉलजी
- 86 ps पॉवर
- 113 Nm टॉर्क
- 5- स्पीड manual गियर बॉक्स
हे इंजिन शहरातील रोजच्या वापरासाठी उत्तम आहे . ट्रॅफिक मध्ये कार स्मूद चालते आणि नवख्या ड्रायवर साठी ही कार सोपी आहे .
Tata Punch pure मायलेज
- ARAI प्रमाणित मायलेज
- शहरात 17-18 km /l
- हायवेवर 19-20 Km /l
या किंमत श्रेणीत Punch चे मायलेज समाधानकारक मानले जाते .
सेफ्टी फीचर्स -Punch ची मोठी ताकत
Tata Punch pure 2026 ही Global NCAP 5-Star सेफ्टी रेटिंग मिळवनारी कार बनली आहे . Base मॉडेल मध्ये खालील सेफ्टी फीचर्स मिळतात ;
- Dual Front Airbag
- ABS with EBD
- Rear Parking Sensors
- Seat Belt Reminder
- मजबूत बॉडी स्ट्रक्चर
रु 6 लाखांच्या कारमध्ये एवढी सेफ्टी मिळणे ही जमेची बाजू आहे .
इंटेरियर आणि कम्फर्ट
Pure मॉडेल Base असले तरी आवश्यक कम्फर्ट फीचर्स मिळतात .
- Power Steering
- Front Power Windows
- Manual AC
- Digital Instrument Cluster
- चांगली लेगरूम व हेडरूम

लहान कुटुंबासाठी योग्य आहे .
Top 5 best smartphone 2026 under 20,000 : जबरदस्त परफॉर्मन्स आणि फीचर्स येथे जाणून घ्या .
Tata Punch pure 2026 ही वेगळी एक्सटेरियर डिझाईन केलेली आहे . यात 187 mm ग्राऊंड clearianse आहे यामुळे मोकळे बसता येते . एसयूव्ही स्टाइल डिझाईन केलेली आहे . मजबूत व्हील आरचेस दिले आहेत . कॉम्पॅक्ट पण mascular लुक दिलेला आहे . ग्रामीण आणि खराब रस्त्यासाठी Punch खूप उपयुक्त ठरत आहे . ही कर सेफ्टी ला खूप प्राधान्य देते ,तसेच कमी मेंटेनान्स असल्याने शहर व ग्रामीण भागासाठी उपयुक्त आहे .
जर तुम्ही रु 6-7 लाखाच्या बजेटमध्ये सुरक्षित , मजबूत आणि विश्वासार्ह SUV शोधत असाल तर Tata Punch pure 2026 ( Base Model ) हा एक उत्कृष्ट पर्याय आहे . फीचर्स कमी असले तरी सेफ्टी आणि परफॉर्मन्स मुळे ही कार “Value For Money” ठरते .
-
Tata Punch ची सर्वात कमी किंमत किती आहे ?
सुमारे रु 6 लाख ( एक्स शोरूम ).
-
Tata Punch Pure मध्ये किती मायलेज मिळतो ?
साधारण 20 Km/ l पर्यंत .
-
Tata Punch पहिली कार म्हणून योग्य आहे का ?
हो , नवख्या ड्रायवर साठी योग्य आहे .
Tata Punch चे सर्व उपलब्ध मॉडेल ( Variants )
यामध्ये Tata Punch च्या सर्व मॉडेल व अनुमानित प्राइस ( Ex -Showroom ) भारत समाविष्ट करून माहिती देत आहे , जी तुम्ही खाली पाहू शकता ..
| ( Variant ) | ( Ex -Showroom India ) |
| Smart | रु – 5.59 लाख |
| Pure | रु – 6.49 लाख |
| Pure+ | रु – 6.99 लाख |
| Pure+S | रु – 7.34 लाख |
| Advanture | रु – 7.59 लाख |
| Advanture S | रु – 7.94 लाख |
| Accomplished | रु – 8.29 लाख |
| Accomplished+S | रु – 8.99 लाख |
या सर्व किंमती Ex -Showroom India आहेत म्हणजे RTO , इन्शुरन्स आणि ऑन -रोड चार्जेस यात समाविष्ट नाहीत . Tata punch चे anual maintenance कमी आहे . साधारण रु 4,000 – रु 6000 पर्यंत प्रती वर्ष खर्च येऊ शकतो . या गाडीचे स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होतात . pure मॉडेल हा only petrol मध्ये उपलब्ध आहे . cng pure variant काही cities मध्ये उपलब्ध आहेत .
Swift 2026 Latest :आकर्षक ,दमदार नवीन मायलेज सह कमी किमतीमध्ये .