
तेजस अपघातातील घडलेली भयानक घटना
tejas crash dubai ही घटना 21 नोव्हेंबर 2025 ,रोजी शुक्रवार या दिवशी घडली .
या घटनेची वेळ दुपारी 2:15 ते 2:20 ( दुबईच्या वेळेनुसार घडली ).ही घटना अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ ,दुबई एयर शो 2025 येथे घडली .
Table of Contents
घटनेचा क्रम :
- भारताचे स्वदेशी लढाऊ विमान (tejas crash dubai ) तेजस दुबई एयर शोमध्ये प्रात्यक्षिक उड्डाण करत होते . विंग कमांडर नमांश स्याल यांनी लुप्स ,रोल्स ,हाय स्पीड टर्न्स सादर केले होते .
- एक लूप पूर्ण केल्यानंतर तेजसने नेगेटिव G टर्न घेण्यासाठी प्रयत्न केला ,परंतु दुर्दैवाने विमान या म्यानुवरमधून सवरू शकले नाही आणि विमान जमिनीवर कोसळले ,या घटनेचा क्रम भयानक होता .
नेगेटिव्ह G टर्न म्हणजे काय ?
G फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल . सामान्य उड्डाणात 1G असतो .
- Positive G : रक्त पायाच्या दिशेने वाहते ,ब्लॅकआऊट होऊ शकतो .
- Negative G : रक्त मेंदूच्या दिशेने वाहते ,म्हणजे जास्त गुरुत्वाकर्षण बळामुळे बेशुद्ध होणे .
माणूस सामान्यता ; -2 ते -3G सहन करू शकतो ,त्याच्यापुढे नाही . G-LOC ( Gravity Induced Los of Consciousness ) म्हणजे गुरुत्वाकर्षण बळामुळे बेशुद्ध होणे .
कोण होते विंग कमांडर नमांश स्याल ?
नमांश स्याल यांचे मूळ गाव पटियालकर ,नगरोटा बागवान ,कांगडा,हिमाचल प्रदेश येथे होते . त्यांचा वर्तमान कार्यकाल सुलूर एयर बेस ,तमिळनाडू ( 45 वे स्क्वॉड्रन ) येथे चालू होता .
त्यांची नियुक्ती 24 डिसेंबर 2009 साली झाली होते . ते एकूण 37 वर्षाचे होते .
कुटुंबाची माहिती
- वडील : जगन्नाथ स्याल ( निवृत्त सैन्य वैद्यकीय कोर्प्स, माजी प्राचार्य
- आई : बिना देवी स्याल
- पत्नी : अफसान ( विंग कमांडर ,भारतीय हवाई दल )
- मुलगी : आर्या स्याल ( 7 वर्षे )
तेजस विमानाचा इतिहास -एकूण 42 वर्षाचा प्रवास
मुख्य टप्पे :
- 1983 : LCA ( Light Combact Aircraft ) प्रकल्पाची घोषणा
- 1984 : ADA ( Aeronautical Development Agency ) निर्मिती
- 2001 : पहिले यशस्वी उड्डाण ( 4 जानेवारी )
- 2016 ; भारतीय हवाई दलात औपचारिक समावेश
- 2021 : 48,000 कोटींचा करार ( 73 Mk1A विमाने )
तांत्रिक तपशील तेजस Mk1A ची खास वैशिष्टे
AESA रडार
एलेक्ट्रोनिक वॉरफेयर सूट
मिड-एयर रेफुएयालिंग
सुधारित अवियूनिक्स
हलके वजन
अपघाताचे (tejas crash dubai) कारण
प्राथमिक तपासणींनुसार नेगेटिव G मन्युवर दरम्यान नियंत्रण गमावले .
कमी उंचीमुळे रिकवरीसाठी वेळ मिळाला नाही .
वैमानिकला इजेक्ट करण्याची संधी मिळाली नाही .
यातूनच भारतीय हवाई दलाने कोर्ट ऑफ Inquiary ( न्यायलाईन चौकशी ) आदेश दिले आहेत . ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर केल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले आहे .
राष्ट्रीय प्रभाव
हा अपघात तेजसच्या निर्यात योजनांवर परिणाम करू शकतो . अनेक देश तेजसची खरेदी करण्यास तयार होते , परंतु या घटनेमुळे भविष्यातील संरक्षण कररांवर प्रभाव पडू शकतो .
tejas crash dubai
भारत देश हा स्वबळावर आपली ओळख निर्माण करीत आहे. भारताच्या संरक्षणाच्या नव नवीन शस्त्रे निर्माण करीत आहे . त्यामुळेच देश भक्कमपणे ठाम उभा आहे . या शस्त्र संधीची ओळख करून दुबई एयर शो मध्ये तेजस नी पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली होती .
विविध पराक्रमानंतर अचानक ही घटना घडली . विशेष म्हणजे या प्रकारच्या विमानाचा अगोदरच्या वर्षी अपघात झालेला होता . पण त्यावेळी वैमानिकाने तातडीने उत्क्षेप ( इजेक्ट ) केल्यामुळे तो बचावला .
पण या दुर्घटनेत नमांश स्याल मृत्यूमुखी पडले .
नमांश स्याल यांचा शेवट
या घटनेमुळे सर्व लोकांवर शोककळा पसरली जात आहे . त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याचे बळ मिळावे .
या घटणे अगोदर विंग कमांडर नमांश स्याल यांनी त्यांच्या वडिलांना असे म्हटले होते की ” पापा माझा दुबई लाईव एयर शो बघा “असे म्हटले होते . वडील हा dubai air show 2025 लाईव बघत होते . ही साद ऐकल्या नंतर मन खूप हळवे होते .
विंग कमांडर नमांश स्याल यांनी देशाच्या गौरवासाठी आपले बलिदान दिले . त्यांच्या कुटुंबांनी व्यक्त केलेले दुख: आणि ” माझ्या मुलाचे तुकडे तुकडे झाले ” हे वेदनादायक शब्द त्यांच्या त्यागाची गाथा सांगतात .नमांश स्याल यांच्या पश्चात आई वडील मुले पत्नी असा संपूर्ण परिवार आहे .
त्यांचा मृतदेह सोमवार किवा मंगळवारी भारतात आणून त्यांच्या वडीलोपार्जित गावात अंत्यसंस्कार केले जातील.
अजून महितीसाठी infomaza24 येथे क्लिक करा .